Pages

Tuesday, November 18, 2008

For Sale : Cloud# 9

तीसरी मधे असताना गाड़ी घेतलेली "Kinetic Magnum". तीच्या पुढे बसून शाळेत जायचो। येताना मी , दादा, मम्मी कसरत करत यायचो. पाचवी -सहावी -आठवी अशीच या लुना बरोबर गेली. नववी - दहावी ला पण याच लुना वर बसून सकाळी ६ लाच क्लास ला जायचो. Impact Cycle होती माझी मस्त पण तरी वेळ वाचवायला लुना वापरयाचो. नंतर scooty घेतली पण दादा लुनाच वापरत होते. जरा मोठा झालेलो... काही दिवसांनी लुना विकायाचं ठरलं ती विकून दूसरी गाड़ी घ्यायची होती . खुप रडलो होतो मी तेव्हा गाड़ी नाही विकयाची म्हणुन ...शेवटी माझ्या हट्टाला मानून नाही विकली गाड़ी .... खुप possessive झालो होतो तय वेळी त्या लुना बद्दल ...अजुनही दादा ती लुना नगर ला गेल्यावर वापरतात ... चांगलं वाटतं आवडती वस्तू जवळ च राहिल्यावर ------"won here"

Impact cycle होती मस्त माझी ...रोज १५-२० km जावून-येवून करायचो. तिच्यानेच height वाढली माझी. खुप भारी होती ती ... शाळेत खुप मजा केलेली त्या cycle वर .... मधेच ती पण विकली .. वाईट वाटलं बरंच ----- "start of losing"

तो पण गेला ... रडायला पण नाही मिळाला अणि हट्ट करून तर काही फायदाच नव्हता --------"Biggest loss"

एकून -एक वीट माहिती होती घराची आम्हाला ..अगदी पाया खनाल्यावर च्या खड्ड्यात खेललो होतो- खड्डे बुजेपर्यंत , नंतर plinth ला बाद लिने पानी मारले , बाँध कामासाठी साठी आणलेल्या वालुत चोर -पोलिस खेललो - waste गेलेली वालू परत collect करायचो , slab घालताना दिवसभर ती घर-घर एइकत सीमेंट ची पोती मोजत बसलो होतो , slab ला 2-3 pipes जोडून बनावालेल्या पाइप ने पानी मारले , आतून plaster चालू असताना scholarship चा study केला, light नसताना, फरशी नीट नसताना, बाहेरून plaster नसताना राहिलो , तिथेच १०वि बोर्डचं , NTSE, KVPY चं success celebrate केला. नंतर एकून-एक centimeter सजवला घराचा ,थोडं -थोडं करत घर मस्त बनलं होतं अणि अचानक असा काही घडलं की ते घर विकून टाकलं ... 3yrs झाले घराला बघितलं पण नाहीये .... नगर तुटलं , घर तुटलं , पण पुणे जोडलं होतं ... ना मी रडलो ना हट्ट केला ----- " another Big loss"

3-४ yrs एकीवर वेड्या सारखं प्रेम केलं, ती पण गेली , मीच तोडली ...थोड़ा रडलो पण हट्ट नाही केला -------"completely lost"

मोठ्या गोष्टीं बरोबर लहान -लहान गोष्टीं वर पण खुप जिव होता ... bluetooth headfones -parents ला रात्रि त्रास होऊ नये म्हणुन घेतलेले , 500 GB HDD, 180GB + movies, खुप सारे फोटो ...mb-mb-gb-gb करत greatest collection केलेलं ... त्या पण गेल्या अशाच ..... 'Alter Bridge' once said in 'Broken Wings'- "The things we hold are always first to go"

आनी आता cloud # 9 ... बाईक आनी बायको ..दोन्ही बाबतीत मुलं खुप possessive असतात ... कलालाच नाही काल तिचा 5th birthday होता ... खुप साथ दिली हीने ... college life मधली सगळी मजा, सगला माज हिच्याच जोरावर केला ... "purple passion +... 8020 ... Cloud # 9" लई भारी वाटायचं, cloud #9 वर असल्या सारखं !!...त्या वेळी 100 cc पण enough होतं ... रोड cross करायला पण गाड़ी वापरयाचो , college to hostel and hostel to college - हजार चकरा रोज , नगर trip, अलीबाग trip, पुण्यात गल्ल्या हिंडताना हीच होती बरोबर...इतकी similarity की तिचा number and माझ्या mobile चा number पण same होता ...8020 ... नगरचे मित्र म्हणायचे "मग काय bike आहे पुण्यात सो फुल पोरी फिरवत असशील ?" ....कसला काय शेवटी virgin च राहिली ....आता तिला विकायची आहे ... credit-card चं तुम्बलेलं bill भरायचं आहे !!! ------"got used to of losing !"

"For Sale : Cloud #9 !! "

3 comments:

Onkar said...

atta paryantacha saglyat bhari post

sagar said...

ummm....i dont think so.. :) neways...

Amit F. said...

Sagya.. Tumchi nili luna.. tuzi impact cycle.. aapla hall chya bhintivar cartoon kadhlela ghar..4 payryanchya kopryatla maticha killa.. 'Tyacha' cool hasana.. sagla asa zarzar dolyasamor yeun gela..
Punyashi jodla gelya nantarcha kahi mahit nahi..bike tar pahili sudha nahiye bahudha.. bike cha rahu de pan i10 kadhaychi asel tar sang.. :P