Pages

Thursday, April 9, 2009

'The Pimp' and 'A Husband' !

'The Pimp' standing at bus-stand waiting for customers for his girl.
thinking "आज तो साला रणवीर नको यायला. येतो आणी चंदाला पार वेडं करून जातो. किती गुंतली आहे त्याच्यात ती.
त्या ४-५ दिवसात बोलायची खुप चंदा माझ्याशी. महिन्यातले माझे ४ दिवस. नुसत्या गप्पा, without makeup बसायची
ती बोलत. धंदा बुडाला तरी चालेल पण 'त्या'दिवसात कोणाला हात लावून नाही दिला तिला. कशाला पाहिजे गोळ्या-बिळ्या
मी होतो ना साम्भाळायला तिला..पण आता ?? 'त्या' दिवसात पण तिला तोच हवा असतो. नुसता बोलत बसतो Romeo साला.
थोडेफार - शब्द बोलायची दुपारी आता ते पण बंद झालयं.तब्येत कशी आहे विचारलं तर recharge card आणायला
सांगते मला. चायला बोलण्यात फ़सवलय साल्यानी. काही-बाही स्वप्नं दाखवलित.Wet-Dream चे patient सगळे.
शरीर भोग रे तिचं मनात तरी मला एकट्याला राहुदे तिच्या....मी काही just तिचा "भड़वा" आहें का ??"

'A Husband' drinking, at bar table last peg before going home.
Thinking "साला सौमित्र, पत्रकार म्हणे ! ३-४ पेपरात articles काय छापून आले तर मोठा filosofer समजतो स्वतःला..
खुप wavelenghts जुळतात म्हणे त्याच्याशी...same topics, same intellect, same issues, same concerns.
सारखं चायला सौमेनबाबु - सौमेनबाबु चाललेला असता. बायको माझी आणि गप्पा त्याच्या.
४-४ कप coffee पित गप्पा मारताना नवरा घास-घास घासतोय ते कळत नाही.थकून आलं की ती पाहिजे असते जवळ पण
तो सारखा घुट्मळतोच गप्पांमधे पण...दिड-दमदिच्या emotions त्या, घाम आला तरी पुसायच्या लायकिच्या नाहीत आणी
जगाचे डोळे पुसायच्या गप्पा...बायकी साले..
जाऊ दे, झोपायला तर माझ्याच खाली येइल ना ? "Husband" आहे शेवटी मी तिचा.
अरे सौमेन बाबु मनाशी खेळ कितीही शेवटी शरीर तर माझचं आहे ना ? हा हा हा "

No comments: