Pages

Thursday, May 28, 2009

समांतर

दरवेळी वाटतं येणारा पाउस यावेळी तरी एकटेपणा घालवेल आपला. हजारो-लाखो धारा घेउन येणारा पाउस, यावेळी एकतरी धार आपली असेल, माझी असेल. बेधुंद कोसळताना एकतरी सर, एखादी चुकार धार विचारपूस करेल. atleast impulse मधे जोरदार कोसळन्याचा अनुभव expressively सांगेल. काही क्षण तरी दुकटं करून जाईल. पण कसला विरोधाभास आहे हा. या हजारो धारा -टिपिकल भाषेत सहस्त्र-धारा म्हणा- आभाळातुन कोसळतात. खुप distance traverse करतात. पण शेवटी प्रत्येक धार एकटी असते, एकमेकांपासून अलिप्त. एकमेकिंबरोबर पडतात पण एकमेकींना समांतर. स्पर्षपण नाही करत पडताना दुसरीला. अगदी शिष्ट, एकट्या, स्वताच्या धुंदीत कोसळतात. आता या अशा एकट्या, अलिप्त, शिष्ट धारांकडून काय अपेक्षा करणार एकटेपणा घालावयाची ??

असा हा येतो अणि अजुनच एकटं करून जातो.... नेहमिचच झालय हे..

No comments: