Pages

Tuesday, June 16, 2009

वळु ?

लेखक आणी कवि are the most useless creatures on earth !

just थोड़ा रिकामा वेळ, काही करायचा-करून दाखवायचा खुप कंटाळा , pen/P.C. and कागदाचा चिटोरा मिळाला की झाले सुरु.... ढेकूण जसा लाकुड मिळालं की वस्ती वाढवायला लागतो तसं.. ढेकणासारखं अतोनात sex सुरु होतो आणी खोर्याने "कलाकृति" निघतात मग यांच्या।

काहीच काम करायचे नसते यांना, सगळी कामं "character" करतात यांची. मग एखादा अगदी पोट सुटलेला, लट्ठ, कधी cycle पण चालवणारा आळशी लेखक एका danger trekker वर book लिहायला लागतो. एका पण धारेने भिजलेला कवि मग घामाघुम होत पावसावर कवितांचे धबधबे चालू करतो. कधी शट्टा हालवलेला चरित्राकर एका उद्योगपतिचा struggle दाखवतो. घरी बायकोला मारहाण करणारा लेखक मग हलका झाल्यावर स्त्री -मुक्ति वर लेख लिहायला बसतो. स्वतः काही नाही करायचं नुसते characters तयार करून मस्त जगुन घ्यायचं , त्यांच्या रुपाने पुस्तकात. बरं असतं आणी सोइस्कर पण ...

आणी अजुन एक. दुसर्याच्या life ला भोकं पाडून त्यांच्या जगण्यातली , tragedi तली , व्यथेतली गम्मत बघत रहायचं "Voyeur" सारखं. त्यांच्या जखमा हुन्गायच्या. ते सगळं मांडलं कागदावर की मग प्रसिद्ध, मग अजुन भोकं पाडा... अजुन प्रसिद्ध....अजुन touching लिहा, अजुन लोकांची दुःख publish करा, अजुन famous...just शब्दांचे बुडबुडे... टिपं गाळन्यापेक्शा घाम गाळलेला किधिही बरा..

anyways ... प्रस्थापित व्हायलाचं हवं. नाहीतर असा राग निघत राहिल...

पण तरीही अजुन वाटतं कुठतरी, चांगला लेखक होण्यापेक्षा चांगला माणुस होणं खुप important आहे आणी हार्ड पण... character लिहिण्यापेक्षा चांगलं character बनणं महत्वाचं आहे. नेमकं उलटं होत चाललय...............वळु ? की अजुन वाट पाहू ?

P.S. : अशी खुप गूढ़ meaning ची, इमोशंस-भरी, अगदी आत-पर्यंत चिरनारी, आतला काहीतरी बाहेर काढून दाखावानारी, अस्वस्थ करणारी पुस्तकं, नाटकं बघू नयेत, वाचू नयेत असं वाटलं परवा --- गुलजार वाचत होतो. एकदम मस्त शांत वाटतं होतं. वाचून अस्वस्थ नाही झालं उलट मोकळं झाल्यासारखं वाटलं. नेहमीच आत आहे तसा कल्लोळ बाहेर शोधू नये. कदाचित बाहेरचा शांतपना आतून पण शांत करेल. Who Knows ? अगदी हाडं दुखेपर्यंत भिजन्यापेक्षा हलकीशी सर अंगावर घेण पण चांगलं असतं - LongTerm साठी..परत वळुशी वाटलं .............

Monday, June 15, 2009

Plastic , Dumbledor , etc...

There are "still" some things in this world, u'll never google for them, no wiki too. E.g. notebook, earbud, चपाती , फणी , etc :) . Plastic ही अशीच एक गोष्ट...environmentalist सोडून कोणी सर्च नसेल केलं याला. पण करावं लागतं बाबा blog साठी...
so म्हणे हजारो वर्षे टिकतं plastic. Degrade होतं नाही, decompose होतं नाही. काहीपण गोष्ट ठेवा त्यात कित्येक दिवस तशीच राहिल. अगदी safe. पैसे ठेवा भिजणार नाहीत, documents ठेवा ख़राब नाही होणार. तुटून राहिलेलं एकच कानातलं जपून ठेवा गंज नाही लागणार, प्रेत भरून ठेवा कित्येक दिवस वास नाही येणार. त्यातल्या त्यात जर आतली गोष्ट जर अगदी टिकाऊ असेल, अगदी कोडगी- प्लास्टिक इतकीच हट्टी. तर मग Don't Worry. Plastic च्या पिशवीत घट्ट बांधून ठेवा आणी कुठेपन खोलवर सोडून दया..तशीच राहिल ती गोष्ट- आठवणी सारखी .....

Dumbledor म्हणे त्याचे Memory Threads काढून एका receptacle मधे ठेवत असतो...

"This entailed creating the Pensieve bowl of floating liquid, the memory threads that Dumbledore pulls from his head and the Trial Chamber digital environment that Harry falls into..."


कसलं भारी .... असं करता यायला हवं. असे memory threads काढायचे आणी plastic च्या पिशवीत बांधून ठेवायचे ...आणी पिशवी ला जड़ दगड बांधून memory pool मधे खोलवर सोडून द्यायचा. काका नाही होता आलं मामा व्हा.."काकापणाची" पिशवी सोडा खाली, "नवरा" होता आलं "friend" व्हा -"जोड़ीदारची" पिशवी सोडा खाली ,Doctor नाही झालात तर Enggineer व्हा "डॉक्टरपणाची " पिशवी बंद करा. असाच Deal करायचं। वेळ नाहीये पिशवी उघडून analysis करायला, और धाडस नाहीये face करायला. so best way. पिशवी बांधा आणी नंतर साठी सोडून दया पाण्यात ...दगड बांधून.....
बरं अस्त म्हातारपनी पानी आटलं की या पिशव्या वर येतात ..मग मस्त पैकी उघडायचि एकेक पिशवी आणी हे सल् चघळत रहायचे..
खुप दिवस टिकतात म्हणे plastic च्या पिशव्या आणी आठवणी-सल् पण .....

जी. ए.

भसाभसा पिल्लं काढत व्यालेल्या डुकरीणी शेजारी तिची चीनी डोळ्याची पिल्लं आडखळत,पेंगत फिरत असतात. अर्धा डझन स्तनांना ती दोनेक डझन पिल्लं लुचत असतात. आणी ती सुस्तावालेली पडून असते...
तसचं होतय..."मला post कर , मला post कर " म्हणुन विषय लुचत असतात कित्येक. काळे - पांढरे - आंधळे , बहुतेक सारखेच bore आणी 'उगीचच'वाले ... आणी मी मात्र "Figure-Conscious" , गोलाई ची चिंता असणार्या "वाईट-डुकरीन-आई" सारखं दूर करतो त्यांना...