Pages

Tuesday, June 16, 2009

वळु ?

लेखक आणी कवि are the most useless creatures on earth !

just थोड़ा रिकामा वेळ, काही करायचा-करून दाखवायचा खुप कंटाळा , pen/P.C. and कागदाचा चिटोरा मिळाला की झाले सुरु.... ढेकूण जसा लाकुड मिळालं की वस्ती वाढवायला लागतो तसं.. ढेकणासारखं अतोनात sex सुरु होतो आणी खोर्याने "कलाकृति" निघतात मग यांच्या।

काहीच काम करायचे नसते यांना, सगळी कामं "character" करतात यांची. मग एखादा अगदी पोट सुटलेला, लट्ठ, कधी cycle पण चालवणारा आळशी लेखक एका danger trekker वर book लिहायला लागतो. एका पण धारेने भिजलेला कवि मग घामाघुम होत पावसावर कवितांचे धबधबे चालू करतो. कधी शट्टा हालवलेला चरित्राकर एका उद्योगपतिचा struggle दाखवतो. घरी बायकोला मारहाण करणारा लेखक मग हलका झाल्यावर स्त्री -मुक्ति वर लेख लिहायला बसतो. स्वतः काही नाही करायचं नुसते characters तयार करून मस्त जगुन घ्यायचं , त्यांच्या रुपाने पुस्तकात. बरं असतं आणी सोइस्कर पण ...

आणी अजुन एक. दुसर्याच्या life ला भोकं पाडून त्यांच्या जगण्यातली , tragedi तली , व्यथेतली गम्मत बघत रहायचं "Voyeur" सारखं. त्यांच्या जखमा हुन्गायच्या. ते सगळं मांडलं कागदावर की मग प्रसिद्ध, मग अजुन भोकं पाडा... अजुन प्रसिद्ध....अजुन touching लिहा, अजुन लोकांची दुःख publish करा, अजुन famous...just शब्दांचे बुडबुडे... टिपं गाळन्यापेक्शा घाम गाळलेला किधिही बरा..

anyways ... प्रस्थापित व्हायलाचं हवं. नाहीतर असा राग निघत राहिल...

पण तरीही अजुन वाटतं कुठतरी, चांगला लेखक होण्यापेक्षा चांगला माणुस होणं खुप important आहे आणी हार्ड पण... character लिहिण्यापेक्षा चांगलं character बनणं महत्वाचं आहे. नेमकं उलटं होत चाललय...............वळु ? की अजुन वाट पाहू ?

P.S. : अशी खुप गूढ़ meaning ची, इमोशंस-भरी, अगदी आत-पर्यंत चिरनारी, आतला काहीतरी बाहेर काढून दाखावानारी, अस्वस्थ करणारी पुस्तकं, नाटकं बघू नयेत, वाचू नयेत असं वाटलं परवा --- गुलजार वाचत होतो. एकदम मस्त शांत वाटतं होतं. वाचून अस्वस्थ नाही झालं उलट मोकळं झाल्यासारखं वाटलं. नेहमीच आत आहे तसा कल्लोळ बाहेर शोधू नये. कदाचित बाहेरचा शांतपना आतून पण शांत करेल. Who Knows ? अगदी हाडं दुखेपर्यंत भिजन्यापेक्षा हलकीशी सर अंगावर घेण पण चांगलं असतं - LongTerm साठी..परत वळुशी वाटलं .............

No comments: