Pages

Monday, June 15, 2009

Plastic , Dumbledor , etc...

There are "still" some things in this world, u'll never google for them, no wiki too. E.g. notebook, earbud, चपाती , फणी , etc :) . Plastic ही अशीच एक गोष्ट...environmentalist सोडून कोणी सर्च नसेल केलं याला. पण करावं लागतं बाबा blog साठी...
so म्हणे हजारो वर्षे टिकतं plastic. Degrade होतं नाही, decompose होतं नाही. काहीपण गोष्ट ठेवा त्यात कित्येक दिवस तशीच राहिल. अगदी safe. पैसे ठेवा भिजणार नाहीत, documents ठेवा ख़राब नाही होणार. तुटून राहिलेलं एकच कानातलं जपून ठेवा गंज नाही लागणार, प्रेत भरून ठेवा कित्येक दिवस वास नाही येणार. त्यातल्या त्यात जर आतली गोष्ट जर अगदी टिकाऊ असेल, अगदी कोडगी- प्लास्टिक इतकीच हट्टी. तर मग Don't Worry. Plastic च्या पिशवीत घट्ट बांधून ठेवा आणी कुठेपन खोलवर सोडून दया..तशीच राहिल ती गोष्ट- आठवणी सारखी .....

Dumbledor म्हणे त्याचे Memory Threads काढून एका receptacle मधे ठेवत असतो...

"This entailed creating the Pensieve bowl of floating liquid, the memory threads that Dumbledore pulls from his head and the Trial Chamber digital environment that Harry falls into..."


कसलं भारी .... असं करता यायला हवं. असे memory threads काढायचे आणी plastic च्या पिशवीत बांधून ठेवायचे ...आणी पिशवी ला जड़ दगड बांधून memory pool मधे खोलवर सोडून द्यायचा. काका नाही होता आलं मामा व्हा.."काकापणाची" पिशवी सोडा खाली, "नवरा" होता आलं "friend" व्हा -"जोड़ीदारची" पिशवी सोडा खाली ,Doctor नाही झालात तर Enggineer व्हा "डॉक्टरपणाची " पिशवी बंद करा. असाच Deal करायचं। वेळ नाहीये पिशवी उघडून analysis करायला, और धाडस नाहीये face करायला. so best way. पिशवी बांधा आणी नंतर साठी सोडून दया पाण्यात ...दगड बांधून.....
बरं अस्त म्हातारपनी पानी आटलं की या पिशव्या वर येतात ..मग मस्त पैकी उघडायचि एकेक पिशवी आणी हे सल् चघळत रहायचे..
खुप दिवस टिकतात म्हणे plastic च्या पिशव्या आणी आठवणी-सल् पण .....

No comments: