Pages

Sunday, August 23, 2009

आमचेयेथे "चीन" येथील सर्वांगसुंदर, शास्त्र-शुद्ध गणेशमूर्ती मिळतील..

नाही नाही , हा पोस्ट अजिबात "Consumerism-Enoughism" वर नाहीये. किंवा "चीनी Dragon चा भारतीय बाजार पेठेत झालेला चंचुप्रवेश" यावर ही नाहीये. अथवा पुणेरी-पेठी संस्कृति वरची टिका वगैरे पण नाही. "पेण", "शाडू", "eco-friendly festivals" या असल्या नविन आलेल्या फैशन वर तर नाहीच नाही. या विषयांवर बोलायचा माझा अभ्यास नाहीये, लायकी नाहीये त्याहूनही जास्ती म्हणजे "interest" तर नाहीच नाही.... मी बरा, माझा ब्लॉग बरा, माझे slices बरे. आठवणीच्या पिकाला कधी दुष्काळ नसतो माझ्याकडं .....

"
श्री सिझनल्स" च्या पत्राने आठवण झाली. "चला जाउन गणपति Book करायला हवा". गेलो. तिसर्या मिनिटाला शाडूचा, पेणचा, एको-फ्रेंडली गणपति बुक केला. नाहीतरी पेणचे बहुतेक गणपति सारखेच दिसतात - टापटीप, एकाच मापाचे, थोड़े लम्बुळके तोंड, सोंड, तब्येत पण slim जरा. अगदीच सदाशिवपेठी वाटतो तो किंवा "को.ब्रा.".गाडीवर मागे बसलेलो त्याला घेउन. हातभार उंचीची मूर्ति, अगदी मूर्तीचे कान छातिपर्यंत आलेले माझ्या। जणू कान लावून माझ्या हृदयातलं-मनातलं ऐकतोय.... १० मिनिटात घरी।


गाँधी मैदानात गेल्याशिवाय गणपति घेउन यायचो नाही मी. अरे कित्ती दुकानं ती गणपतीची, शोभेच्या items ची, प्रसाद-गुलालाची.... आणी त्या भूलभुलैया मैदानात आलेले हजारो गणपति।
अगदी लहान-innocent बाल-गणेश - इतका cute की असं वाटावं की मित्रच माझा बसलाय मास्क घालून....
Ditto
शंकरावर गेलेला, निळ्या रंगाचा,जटाधारी पोरगेला गणेश...
आई-वडिलांच्या मांडीवर बसलेला लहानगा गणपति...
कधी सुंदर मोरावरचा slim गणेश तर कधी ढोल्या उन्दरावरचा पोट संभाळत बसलेला लट्ठ गणपति।
ख़ास "बागडपट्टी स्पेशल" श्रीमंत बालाजी-गणपति...
किंवा दरवेळी अगदी same pose मधे बसलेला, उगाचच-श्रीमंत आणी त्यामुळे जास्तीच लट्ठ वाटणारा , आपल्यातला नसलेला - दगडू"शेठ" (choice करायला सर्वात सोप्पा )
मुकुट घातलेला, मस्त middle-aged, थोडं टक्कल पडलेला आणी पोट जरा जास्तीच सुटलेला गणपति...
किंवा अगदीच शांत, तटस्थ भाव असलेला, अगदी कोरीव डोळ्यांचा, mature गणपति .....
अरे किती प्रकार , किती स्वभाव, किती रंग आणी किती रूपं...शिवाय किती sizes ...
शेवटी सगळं फिरून मन भरलं, वडिल चिड-चिड चिडले की ओळखीच्या सरांकडं जायचो -स्वस्तात मस्त मूर्ति मिळायच्या. मग एक मोठी - नेहमी वेगळी - भारीवाली गणेश मूर्ति घेउन तासाने घरी ........

गरीब बिचारा सुन्या पण मग त्याच्या लहान बहिनिसाठी लहानशी - तळव्यात मावणारी मूर्ति घेउन यायचा. मग आमची मूर्ति मोठी -"हातभर" अन् त्याची लहान "- इंचभर" हे बघून अजुनच जास्ती आनंद व्ह्यायचा...
जितकी मूर्ति मोठी तितकी भक्ति मोठी ! समाजाचं वय लहान मुलाइतकं असतं हे पटलं मला आता ...

खरं तर गणपतिशी तसं वाकडं नाहीये माझं. तो बिचारा बुद्धिदेता. आणी मला पण ठीकठाक मिळलिये ती. शिवाय त्याने कोणाचं वाईट केले आहे असं पण नाही. पुराणात पण त्याच्या वाटेला "शाप देण्याचे" scenes पण कमीच आलेत. एखादा दुसराच आणी तो पण "बालसुलभ शाप" (लहान मूलं पडल्यावर अंगाला लागल्यापेक्षा कोणी हसलं की जास्ती रडतं तसं). त्यामुळे गाडीवर त्याला घेउन बसलो होतो तेव्हा वाटलं इतका जवळ आलय तर काहीतरी बोलावं त्याच्याशी. mouse आहे म्हणा त्याच्याकडं पण इन्टरनेट नसेल तर माझा ब्लॉग कसा वाचता येइल त्याला ? ऐकला असेल का monologue त्याने माझा ?
Jokes apart !!

पण आता मोठा झालोय मी. माणसांची गर्दी आणी गणपतीच्या प्रतिमांची गर्दी सारखीच वाटायला लागली आता. मूर्तितला innocence , भाव-बिव , त्याची रुपकं समजन्या इतका मीच innocent राहिलो नाही. त्या सुपा इतक्या कानाच्या, लट्ठ पोटाच्या , सोंडेच्या, आतल्या मेंदूच्या सगळ्या कथा-कल्पना किती फोल आहेत ते पण कळलंय आता. नवस-सायास, कौल, सांगणं-ऐकणं-मागणं, हार दूर्वा चंद्रोदय यात मन भूलत नाही. नसलेल्या श्रद्धेचा बाजार पण मांडता येत नाही आता. मी आणी सुन्या एकच वाटतो आता. तो बहिनिसाठी आणी मी घराच्यांसाठी मूर्ती आणतो.

मग आता "चीन" काय अन् "पेण" काय .....

1 comment:

sagar said...

blogger aata post edit karu det nahiye ha .. so...

१ वर्ष राहून पुढच्या गणपतीला "खो" द्यायचा नविन गणपति... आख्खा वर्षभर राहून पण विसर्जनाच्या दिवशी वाईट वाटायचच ... मग रडारड वगैरे .....

यावेळी artificial tank मधे त्याचं विसर्जन करत होतो.... "पुनरागमनाय" म्हणत .... तरीही हललचं आत... सोडवत नव्हतं पाण्यात त्याला तिसर्या वेळीही...
कितीही वरवर दाखवलं तरी आतला चेहर्यावर येतच होतं... पटकन बाहेर पडलो तिकडून ..बरं झालं कोणी कही विचारलं नाही...
गाडून ठेवलेलं असं ऐनवेळी वर येतं .... हे संस्कार, वैगेरे अगदी आतपर्यंत घुसलेत - हाडा मांसाच्याही आत...