Pages

Sunday, September 13, 2009

(Be)Foreplay / Making of Rapunzel

गार्बोचा इतका जबरदस्त प्रभाव पडलाय की आतलं खरं-खरं मांडावसं वाटतं आजकाल... मग सगळीकडे पँझी, इंटुक दिसतात. माझ्या आत पण बर्याचदा. आणी मग मोह आवरत नाही त्यांच्याशी थोडी similar characters मांडायचा. अगदी exact त्याच shades नसतील. कदाचित बराच faint असेल इंटुक यात , पँझी १ shade dark नाहीतर किंवा अगदीच contrast श्रीमंत पण ...पण सापडतात ,सापडली म्हणुन मांडली ...
ठीके बास झालं पाल्हाळ ... तिकडे गार्बो सुरु होण्याआधीच इन्टुक ने पकड़ घेतलेली असते आणी इथे ५ ओळी झाल्या तरी मुद्द्याला हात नाही :)

पँझी : इंटुक ...ऐ इंटुक...... तू का नाही रे लिहित असं ?
इंटुक : कसं ?
पँझी : कसलं रोमांटिक लिहिले याने बघ ... मलाच जरा horny वाटायला लागलय वाचून ...
इंटुक : despo झालायस तू पँझी....रोमांटिक वाचून इरोटिक वाटणं बरं नाही...
पँझी : चायला...आता झालो तर झालो horny. तुझ्या सारखा जख्ख नाहीये मी. बघ ना आता, भर गर्दित इतके जवळ आलेत ते...काही कोणाची, कशाची पर्वा नाहीये . खुप वारा सुटलाय सोबतीला... just दोन बोटं अंतर उरलय ओठांमधे त्यांच्या. ....आणि ...आणि .....आता माझेच ओठ ...........काय म्हणतात त्याला ------ इंटुक, त्याला काय म्हणतात रे ?? ते जसे हात सळसळतात , शिवशिवतात. तोंडाला पाणी सुटतं तसं रे ...अंगाला खाज सुटते तसं... "ओठ" काय होतात ? सांग ना ... "ओठ लसलसने का ?" नाहीरे ...
इंटुक : स्वर्ग २ बोटं उरणे ....
पँझी : नाहीरे.."बालभारती" नको सांगुस ..."ओठ काय होतात ?" ते सांग ...तू नाही वापरला का असा काही वाक्प्रचार कधी ?
इंटुक : नाही बाबा ..अशा गोष्टी लिहिन्यापेक्शा केलेल्या बऱ्या. कुठं शब्द शोधत वेळ घालवायचा ..नाहीकारे श्रीमंत ?? विचार श्रीमंतला. त्याचा "Global Experience" आहे बाबा. बोला श्रीमंत तुमचे "ओठ" काय "होतात" अशा वेळी ?
श्रीमंत : हा हा हा ... Depends म्हणजे ...पलिकडे कोण आहे यावर .... साला पँझी मलाच विचारात पाडलस तू ..थांब जरा वेळ. मी आठवून बघतो.
इंटुक : पँझी ...बघ पकड़ श्रीमंत ला. तोच सांगेल. आमच्याकडं खुप VEG लिहावं लागतं बाबा... म्हणजे Lubrication घ्यायचे ते पण "साजुक तुप" असं... "सात्विक प्रेम" असतं बाबा साहित्यात :) बोल श्रीमंत....
श्रीमंत : बौबी होती ना तिचे ओठ अंजेलिना जोली सारखे होते मोठेमोठे. काहीच वाटायचं नाही त्यावेळी. आणी संजना -तिचे तर लांबच लांब. सम्पायचेच नाहीत ... जूलिया रॉबर्ट सारखे ..आडवे केळ खाऊ शकणारे ...पण जुईली माल होती एकदम ...तिचा वरचा ओठ लहान होता - नाजुक एकदम ... थरथरायचा मस्तपैकी ....गेल्या साल्या सगळ्या मजा मारून निघून. पँझी कशाला त्यांची आठवणी काढायला लावलीस ?
इंटुक : मुद्द्याचं बोल श्रीमंत. उगाच ओठांची मापं सांगू नकोस ...
पँझी : अरे कसला भारिये हे... "ओठांचं माप.." ...अमेझिंगे रे हे ...
"डार्लिंग, तुझ्या ओठांचे माप घेऊ देत मला..."....नाहीनाही अगदी रानटी वाटतं हे... तरल हवं काहीतरी.
इंटुक .... हे कसयं
"प्रिये ये निघोनी ढगांच्या कडेने ..मला तुझ्या ओठांचे माप घ्यावेसे वाटताहे " ... इंटुक ...वापर नारे हे.
कसलं भारी आणि कधी वापरलेलं पण नाहीये कोणी..
इंटुक: टेलर आहे का मी ? ओठांची मापं घेउन स्टोरी लिहायला?
श्रीमंत : नाही इंटुक. बरोबरे पँझीच. लिही काहीतरी यावर. एखादी मस्तं story... नेहमीचं तुझं भंकस सोडून।
इंटुक : असलं उथळ लिहित नाही मी श्रीमंत ..... अरे एखाद्या GF-BF च्या teenage story सारखं वाटतय. आणी शिवाय हे "ओठांवर" लिहिलं की एक्सेप्ट नाही करत रे लोक.. स्टोरी कमरे खली घसरली की लगेच यांच्या भुवया उन्चावतात .. असं अगदी उच्च प्रेम लागतं यांना..Idealist , त्यागमय वैगेरे असेल तर अजुनच भारी. असं डायरेक्ट कोणत्या पण रोमांटिक स्टोरीमधे नाही टाकता येणार हे वाक्य..
पँझी : मग काहीतरी वेगळी स्टोरी काढ. सेंटी वाली आणि मग त्यात टाक हे.. टाकच पण हे इंटुक... माझी शप्पथ आहे तुला..
श्रीमंत: पँझी येड्चाप आहेस कारे ? शप्पथ कसली घालतोस ..
इंटुक : ऐका "प्रत्येक क्षणी एकत्र रहायची शप्पथ घेतली होती दोघांनी ..पण आता ते वेगळे आहेत एकमेकांपासून.. खुप लाम्ब .. परिस्थितिने दूर केलय त्यांना.. टिपिकल सॉफ्टवेर लोकांची स्टोरी रे.. नवरा टोकियो तर बायको london ला.. फुल हाई प्रोफाइल LoveStory ..अणि मग त्यांची फ़ोनवरचि संभाषण.. रोमांटिक वाली..अंतर हजार मैलांचे अणि गोष्टी intimate अगदी ....
श्रीमंत : "Distance Loving" गुड आहे ... पण मग यात सेंटी काये ?
पँझी : का बरं लांब रहाताहेत ते ? काही reason ? एकत्र राहून मजा करायची सोडून ..
इंटुक :काही अपरिहार्य कारण पँझी ..
पँझी : कोणती ....? पैसा ?
इंटुक : हा चालेल ते कारण पण ..
श्रीमंत : इन्टुक पैसा हे खुप टिपिकल कारण झालं यार .. यात आता लोक गुंतत नाहीत .. काहीतरी वेगळ कारण काढ..
इंटुक : बरोबरे .. पैसा फॉर बंगला, गाड़ी नको ..काहीतरी Genuine Reason हवं .. पैसा फॉर डेब्ट पण खुप लो सोसायटी होतं . ओके ..पैसा फॉर आजारपण ...
पँझी : हो ..Cancer Treatment ..आईला कैंसर आहे त्याच्या ..किंवा घरातल्या कोणाला तरी ...
इंटुक : चालेल पण ..अजुन वाईट थोडं. जास्ती relate व्हायला हवं लोकांनी.
श्रीमंत : नको रे इंटुक .कैंसर नको..कैंसर एइकला की मला ती ChemoTheropy आठवते.. मग ते डोसेस..ते हाल त्यांचे ..केसं गेलेली मानसं.. लांब सड़क केसांच्या, बार्बी सारख्या डोळ्यांच्या जुलीला पाहिलेलं. भुवयांचे केस गेलेले. लांब सड़क केसांच्या ऐवजी टक्कल नुसतं...नकोच ते ..
इंटुक : एईक तरी ...Rapunzel ची स्टोरी माहितीये तुला ? एकदम लांब केसांची राजकन्या- ४ मजले लांब वेणी ..तिला जर कैंसर झाला तर ? जातील सगळे केस तिचे ? का Fairy ला नाही होत कैंसर ? माणसांनाच होतात ? की माणसांच्या Fairy ला ? त्यांच्या मुलीला झालाय कैंसर आणि तिच्यासाठी पैसे ग़ोळा करायला तो तिकडे आहे आणि ती इकडे एकटी.. दोघं लढत आहेत आपल्या आपल्या फ्रंट वर .. मग कसला आलाय सेक्स, रोमँटीकपणा ... त्यापेक्षा खुप जास्ती असत पँझी जगात ..वाकय म्हणुन चांगले आहे हे. पण शेवटी .. "कसा आहेस ?" "एकटं वाटतय ?" "कधी येनारेस परत " असी वाक्यं जास्ती जवळ वाटतात.. शेवट लग्न म्हणजे फ़क्त शरीर नसतं....
पँझी : मान्य आहे पण लहान मुलांना नाही आणयचा आजार कधी तू ..
श्रीमंत : हो इंटुक .. स्टोरीसाठी कशाला कोणाचा जीव घ्यायचा ? मुलांना मारायच नाही .. नको लिहू त्यापेक्षा काही .. राहू देत.. तू आता पक्का लेखक बनलायस .. लोकाना रडवा अणि पैसे मिळवा ..
इंटुक : हेच विकतं आजकाल.. हीरो किंवा कोणी मेला शेवटी की movie Hit.. असं बघा आपल्या Rapunzel ला टकलं कसं पाहावेल राजाला ?
पँझी अणि श्रीमत : (एकदम) ... बस कर इंटुक ...
पँझी : नको लिहुस इंटुक, सॉरी में तुला भरीस पाडलं.. सगळा मुड घालवलास तू .. श्या ..चल श्रीमंत बाहेर जाउन येऊ ..
इंटुक : ठीके..नाही मारत कोणाला.. just indirect उल्लेख..की कोणाला तरी झालाय may be बायकोला त्याच्या .. ओठ काळेनिळे झालेत तिचे weakness मुळे .. तिला लिपस्टिक देऊ पाहतोय तो ..परत आधीसारखी करायला ...चालेल आता ?
पँझी : गरज नाहीये इंटुक आता मला तुझ्या स्टोरीची..
इंटुक : पण मला आहे ना आता .... मी लिहिणारे ...अणि नाव पण देणारे "Rapunzel" अणि परत "मेकिंग ऑफ़" ची ही Discussions पण ...
पँझी अणि श्रीमंत : राग येतो मला तुझा इंटुक खुप ... निर्लज्ज आहेस तू ...अणि दगडपण

---
गार्बोच्या पुस्तकाच्या फ्रंटपेजवर गार्बोचं चित्र आहे..फुलांचा गाऊन घातलेली ती अणि तिच्या पोटात इंटुक , पँझी अणि श्रीमंत याचं चेहरे आहेत... पोटात कोणाचं मूल आहे ते नाही माहित म्हणुन ...
गार्बोच्या गर्भात हे तिघे असतील..पण सगळ्यांच्या डोक्यात हे तिघे असे असतात .एकमेकांना मारत, चिडवत , डिवचत ... कधी desperate पँझी जिंकतो कधी निर्लज्ज इंटुक तर कधी मन मोकळा श्रीमंत जिंकतो ....


यावेळी पण इंटुक जिंकला माझ्यातला. वाईट वाटतय ..अजुनही वळु का ?

No comments: