Pages

Sunday, January 24, 2010

निसटलेले क्षण !

Reality :
5 Radio stations tuned आहेत कार मध्ये माझ्या. so पटापटा stations change करत जायचं जोवर आवडीचे गाणे लागत नाही तोवर.
Somehow she was in my car. After a long time. मी, ती, माझी कार आणि music जोडीला. Felt really good.

Station 1. कोणतीतरी बकवास Advertisement .......... लगेच change
Station 2. "घण्टा सिंग... " No way . change
Station 3. "पहला पहला प्यार है ....".... ummm नको आता ..
Station 4. "Clocks " yes. "Coldplay" चालेल... so continue.

but then dropped her home. Felt really bad !
Ooops ! "पहला पहला प्यार है ...." her favorite song. Dumb i was.
तरी ती म्हणत होती त्यावेळी इंग्लिश नको म्हणून. Shit, Shit, Shit !! इतकी पण लोकांच्या emotions पर्वा नाहीये. OMG ! what to do ?
Should i say her sorry ? at least some apology. May be she did not observe it. or frndshp मध्ये हे असा सांगणं प्रशस्त नाही वाटत. काही वेगळा meaning निघाला तर ?
Restless Night.
किती सुंदर क्षण निसटला !
(then the popat was - "पहला पहला प्यार है ...." गाणे नाही तर "मैने प्यार किया" मधले गाणे favorite आहेत तिच्या)

Fantasy :
Both are on the way for a dinner somewhere. early stages of dating. a bit tension in the relationship. so कार मध्ये कोणी बोलत नाहीये.
5 Radio stations tuned आहेत कार मध्ये. तो पटापटा stations change करत एकमेकांशी न-बोलण्याची खोटी कारणं सापडतोय.

Station 1. कोणतीतरी बकवास Advertisement .......... लगेच change
Station 2. "घण्टा सिंग... " No way change
Station 3. " मेरे रंग में ......" .... ummm नको आता ..
Station 4. "Clocks " yes. "Coldplay" चालेल... His favorite. so continue

Reached at the restaurant. Pool-side table.
And surprise ! surprise !! surprise !!!
3 musicians are playing for her. Playing her favorite song. " मेरे रंग में ........" from "मैने प्यार किया"
तो , ती आणि music जोडीला .........

तो विचार करतोय "आता कशी नाही होणार impress. After all, i know her...."
ती विचार करतीये "मगाशी हेच गाणे luckily radio वर लागले होते तर change केलेस, आणि आता ? "बुंद से गयी वो हौदसे नही आती". तो क्षण निसटला. आता या क्षणाचं काय कौतुक ".

आपण काय शिकलो ?
१. As a normal person - लाखो घटना रोज घडत असतात. एका क्षणाची एक घटना. जितके क्षण पकडता येतील तितके पकडायचे. निसटलेले क्षणही काही कमी नाहीत.
२. As a blogger/writer -लिहणं बरं असतं खूप. आपण केलेल्या चुका आपल्या पात्रांकरवी दुरुस्त करता येतात. आपल्या आयुष्यातून निसटलेले क्षण जागून घ्यायचे त्यांच्या करवी. तितकंच मनाचं खोटं समाधान !
३. As a Sagar - त्या रात्रीचा impulse ओसरल्यावर दुसऱ्या दिवशी विचार आला, कशाला दुसर्यांच्या आवडी-निवडी, emotions ची पर्वा करायची ? कोणी करतं का आपली ?

Friday, January 15, 2010

Jokes Apart !

Jack : कुठून आणायचे दरवेळी नवीन जोक्स ? तुला पण काही सुचत नाहीये नवीन.

काय timepass चाललाय तुझा ? फेकून दे तो मोबाईल.

जा. गरम पाणी आण रंग काढायला.

Jill : आधी हा SMS ऐक Jack.

" Eve म्हणते Adam ला : सांग ना, तू खरच माझ्यावरच प्रेम करतोस ना?.

Adam म्हणतो : इथे दुसरं कोणी आहे का ?"

Jack : झाला जोक ? यात काय आहे हसण्यासारखं ? SMS च्या जोक्सला लोकं हसत नाहीत आजकाल.

Jill : Jack , आपलं लग्न पण अश्याच अपरिहार्यते मुळे झालाय का ? दुसरं कोणी बुटके मिळाले नाही म्हणून ? जवळपासच्या जगात ३ फुट उंचीचे केवळ आपण दोघंच होतो म्हणून ? इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून ?

Jack : तुला माहिती आहे याचं उत्तर !!

Jill : हो माहिती आहे..... माहिती होतं. मान्य पण होतं मला. पण परवा Sweetie चा divorce झाला, त्यावेळी खूप भीती वाटली. Love-Marriage असूनही जर असं होऊ शकतं, आपलं तर ....

Jack : दुसऱ्या बरोबर का आपल्या relation ला compare करतेयस ? आपण दुसऱ्यासारखे आहोत का ?

Jill : तसं नाहीरे. पण मला कळत नाहीये कि आपल्या relation मध्ये प्रेम जास्ती आहे कि adjustment ?

Jack : Eve कधी Evolve च नाही झाली.

तुला काय वाटतं आपली Circus पाहायला जे Couples येतात त्या सर्वांचे एकमेकांवर प्रेम असते ?

खर्र- खुर्र प्रेम ?

सगळ्यांनी कुठे ना कुठे Adjustment केलेलीच असते. एकदा Adjustment करायची आहे असं ठरवलं तर बाहुली बरोबर पण संसार करता येतो.

पण कोणीच "इथे दुसरे कोणी नव्हते म्हणून" हे मान्य नाही करत आणि आपण मान्य केलाय इतकाच काय तो फरक.

Jill : इतक कसं रे कडवट बोलतोस तू. बोलला असतास थोडं खोटं, म्हणाला असतास "प्रेम जास्ती आहे " तर काही बिघडलं असतं का ?

Jack : टाक. पाणी टाक. रंग काढू दे चेहऱ्यावरचा.

दिवसभर तोंडाला रंग लावून, खोटे मुखवटे घालून फिरतो आपण. Adjustment च्या चेहऱ्यावर प्रेमाचा खोटा रंग लावून.

एकमेकांबरोबर असताना तरी आपण खरं बोलायला हवं नाही का ?

आपल्या relation मध्ये प्रेम आणि Adjustment पेक्षा हा खरेपणा खूप जास्ती आहे ....

-------------------

Cast : Jack & Jill - Dwarf couple working in some Circus.

Monday, January 11, 2010

समेवर...

आधी तुला बघायचो मग स्वर कळायचे मला. स्वरांची पहिली ओळख कानाआधी डोळ्यांनीच करून दिली. तुझ्या चेहऱ्यावरचे हाव-भाव वाचूनच तर रागदारी कळाली मला.

आपल्या खटल्याच्या घरात कुठला आलाय एकांत ? त्यामुळे तुझ्याजवळ राहण्याची संधी म्हणून बासष्ठचा सवाई अजून आठवतो मला. हिवाळ्याच्या ४-५ दिवसात तुझ्या बरोबर काढलेले कित्येक तास आणि शिवाय संगीत जोडीला.

आपला पहिला सवाई. गर्दीत बुजलेली तू , तानपुरयाचे पहिले स्वर ऐकताच स्तब्ध झालीस. तानपुरा लागे पर्यंत तुझे काळेभोर, आसुसलेले डोळे स्वरमंच शोधात राहिलेले आणि मग हिराबाईंचा षडज लागला. त्याच क्षणी तू डोळे हलकेच मिटलेस..... कदाचित दुसर्या कोणत्याच sense ने कानाला मिळणारा आनंद biased होऊ नये म्हणून visual sense तू बंद केलास. 'दीर्घ "कश" घेताना डोळे आपोआप का मिटतात ?' या नुकत्याच पडलेल्या कोड्याचे पण मला उत्तर त्यावेळी मिळालेले. अगदी स्वर न स्वर तू साठवत होतीस आणि तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. अजूनही षडज लागल्यावर तुझेच डोळे आधी दिसतात नंतर तो कानांना समजतो...

मग प्रत्येक तानेला होणारी तुझी भुवयांची हालचाल, हरकती ऐकताना तुझ्या नाजूक ओठांची थरथर आणि समेवर येताना मानेला दिलेले हलकेसे झटके. कितेक वेळ मग सगळा 'तिलक कामोद' मला तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता, समजत होता.
संगीतातला ओ कि ठो काळात नव्हता त्या वेळी पण काहीतरी नवीनच अनुभवत होतो मी. ती तुझ्या सौंदर्याची अनुभूती होती कि संगीताची हे अजूनही सांगता येणार नाही. पण त्या वेळेपासून नवीच दिसलीस तू मला, नितांत सुंदर.

तुझ्या सोबतीत आजूबाजूचं संगीत पण नव्यानेच ऐकू यायला लागलं होतं.
आणि मग मला ते वेडच लागलं - तुला ऐकताना बघायचं !

आलापी ऐकताना पापण्यांची होणारी मंद थरथर अगदी डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या आल्या तरी तशीच हवीहवीशी वाटायची मला.

तबल्याच्या तालांना आपल्या नाजूक पावलांनी ठेका द्यायचीस. मऊशार पावलं आणि ती पैंजणं . विलंबित त्रितालात लोकांना तबला ऐकू यायचा आणि मला तुझ्या पावलांच्या ठेक्याने वाजणारी पैजणे. नंतर पावलं भेगाळली तरी तबल्याची साथ अजून तशीच होती...आणि मला ऐकू येणारी ती पैंजणांची छुमछुम पण...

अतिशय अवघड ताण घेताना आपसूक तुझाही हात वर जायचा. हिरव्याकंच नऊवारी मधून तो गोरापान हात बाहेर यायचा आणि त्या हातांमधल्या त्या गडद हिरव्या बांगड्या. नेहमी पदराआड लपलेले ते सोंदर्य अशावेळी नकळत बाहेर यायचे. लोकं त्या अचूक तानेच्या/जागेच्या सोंदर्यसाठी "वाह !!!!" म्हणायचे अन माझ्या हि तोंडून "त्या" जागेसाठी "वाह !" निघून जायचे. मीही मग अश्या अवघड तानांची वाट पाहत बसायचो. अजूनहि पाहतोय.

मैफिल संपली कि भानावर यायचीस तू, पदर वगैरे नीट करून सावरायाचीस. मग संपला दिवस कि नदी काठावरून घरी जाताना एरवी अबोल असणारा मोगरा फुलून यायचा. किती सांगू किती नको असं होऊन जायचं तुला. अगदी सगळ्या जागा, सगळे राग, बंदिशी त्या हिवाळ्याच्या थंडीतच समजल्या मला.
'सवाई' 'थंडी' शिवाय रंगत नाही म्हणे पण आपली 'थंडी' 'सवाई' शिवाय रंगायची नाही. भारावलेले दिवस ते.
हळूहळू मग माझ्या भावनांना, वेळा-काळाला, प्रहारांना राग समजत गेले. त्याहून महत्वाचे म्हणजे मला "तू" समजत गेलीस....

मैफिलीच्या सर्वोच्य क्षणी शहारून तू डोळे उघडयाचीस, मला शोधायला. तो क्षण तुला माझ्या बरोबर share करायचा असायचा. तुझे ते पाणीदार डोळे बघून माझ्याही अंगभर शहारा फुललेला. मग कळायचं नाही हा शहारा त्या उत्कुष्ट संगीताचा असायचा कि तुझ्या नजरेचा. असे कित्येक क्षण एकत्र जगलेलो, एकत्र शहारलेलो. संगीतामुळे शहारा आला कि शहारलेली, डोळ्यात थोडेसे पाणी आलेली तू दिसतेस. गेल्या चाळीस वर्षात असे कित्येक क्षण सवाई ने दिले....

आणि आता....
माझा चाळीसावा सवाई ! पण तुझ्याशिवाय पहिलाच !!
पण या वेळी स्वरांची कसोटी आहे. ते सगळे स्वर 'ऐकताना' तू 'दिसायला' हवियेस आता मला....