Pages

Monday, February 22, 2010

Bookmark !

(फोन वाजतोय...)
विंदा : ....'दा' ...
वृंदा : ...'दा' ?? हलो . विंदा तू ? flight मिस झाली ? शिकागोला पोचलास लगेच ? कुठे आहेस तू ?
विंदा : शांत हो 'दा' ...transit मध्ये आहे...Dubai Airport वर कुठेतरी... एक काम कर माझं..
वृंदा : काय झालं ? काही राहिलं का ? Invitation letter ? "Forex" ??? कितीरे वेन्धळा आहेस तू. विसरलास का काही इकडेच ..
विंदा : २ min. गप्प बसशील 'दा' ? ... बेडरूममध्ये जा आपल्या. विसरलोय मी एक गोष्ट....
वृंदा : तू ना ...
विंदा : गप्प...एकदम गप्प ! बेड जवळ जा..माझ्या उशाशी ते पुस्तक असेल "आदिमाया"....
वृंदा : हं ...
विंदा : काल रात्री तुला वाचून दाखवत होतो. हा तेच पुस्तक .. झोपून गेलीस मांडीवरच ऐकता ऐकता ... तुझ्या केसाची hairpin आहे bookmark त्या पानावर....
वृंदा : हो आहे. पान ९३.
विंदा : अं अं ...हळूच.... जपून... तुझ्या पापणीचा केस पण आहे त्या पानावर... कालच तुला वाचून दाखवणार होतो हि कविता....
(दोघेहि एकदम) "घराकडच्या आठवणी..."
विंदा :
"घराकडच्या आठवणी : दारावरच्या कडीच्या, घातल्या घातल्याच्या ,
न्हाणीतल्या साबणाच्या सवयीच्या वासाच्या. चौघांच्या श्वासांच्या.
चड्डीच्या नाडीचे टोक आत गेल्याच्या.गालफुगव्या आवळ्याच्या ,...."
वृंदा :
"..... खिडकीवरील कावळ्याच्या,थर्मामीटर फुटल्याच्या, एकदाची गाठ सुटल्याच्या.
भांडल्याच्या, शेजारणीच्या उखळामध्ये रेशनची करड कांडल्याच्या.
बटणे हरवल्याच्या ; हरवल्यावर सापडल्याच्या ; सापडून पुन्हा हरवल्याच्या."

(वृंदा बेडवर बसत ...त्याच्या पांघरुनाला जवळ घेऊन .. )
...दा :
"....बीटाच्या, थीटाच्या, केरसुणी बांधल्याच्या. फुटकी कांच सांधल्याच्या.
आमसुलाच्या साराच्या, लोणच्याच्या खाराच्या. गौरीच्या, गणपतीच्या.
आरशावर पडलेल्या तेलाच्या डागाच्या; रुसलेल्या रागाच्या."
...दा :
"....'आम्ही-म्हणजे-अडचणी'च्या ; 'सगळी सोंगे' वगैरेच्या; 'पावडर-दिसते-आहे-का' च्या.
बाटलीमध्ये अडकलेले सबंध बुच काढल्याच्या. हातावर वाढल्याच्या.
आशेच्या, निराशेच्या. रद्दीमध्ये फसल्याच्या. संडास बंद असल्याच्या.
चेंडू हरवून झाल्याच्या. खिडकीशी काढलेल्या कानातल्या मळाच्या.
संथ खोल पाण्यामध्ये नियतीच्या गळाच्या. एकटीच्या बळाच्या .........."

...दा : खूप जास्ती आठवण येणारे तुझी.....
...दा : तुझा आवाज ऐकायचा होता कधीपासून ...
...दा : ..खूप काही तिकडेच विसरून चाललोय मी .....

Sunday, February 21, 2010

Graffiti !

....नाहीतरी मी काय करतो ? ब्लॉगच्या या पांढर्या भिंतीवर Graffiti च काढतो. चित्रकला काडीची येत नसूनही !

भिंतीवर काही गणितं लिहून दिली होती मृणालला. अवघ्या १० मिनिटात "Multiplication With Carry Over" शिकली ती.
...पण तरी चिडले वडील मृणालवर 'भिंत खराब केली' म्हणून. माझीच आयडिया होती पण बोलणे तिला खावे लागले. Asian Paint Royal ची- सैफअली खान ची - Ad आठवली.

खरतर भिंत आणि त्याला पेंट करतानाचा Scene मला नेहमीच खूप Romantic वाटत आलाय. मग तो RHTDM मधला "चुराया चुराया " चा असो वा 'आर्यन' सारख्या बकवास फिल्म मधलं "जानेमन" गाणे असो. किंवा सैफचीच Royal Play ची advt.
पूर्ण मोकळं घर - आणि त्यात दोघंच - घराला आपल्या मनासारखे रंग भरताना. ते रंग देतानाचे moments खूप मस्त वाटतात. नव्याकोऱ्या डायरी मध्ये आपले पहिले-वाहिले शब्द लिहितानाची अवस्था . अगदी एकदम कोऱ्या कॅनवासवर आपल्याच मनासारखं चित्र काढायचं स्वातंत्र्य. नवं आयुष्य अगदी आपल्याच परीने रंगवायचं स्वातंत्र्य ! जणू या भिंती आपल्या आवडीनुसार रंगवल्या तर बाकी आयुष्य पण आपल्या आवडीनुसार रंगेल (हा भाबडेपणा ! ( पण आवडतो मला)).

खरतर "भिंत" हि नेहमी बंधनाचे, पारतंत्र्याचे प्रतिक ठरत आलीये. चीन - बर्लिनची भिंत, भाषा-देश-प्रांत यांची भिंत, जेल ची उंचच उंच भिंत किंवा "ये दिवार तोड दो " वाली भिंत. नेहमीच ती कोणाला कोणाला अडवत आलीये. आणि त्याच भिंतीवर, कशाला हि न जुमानता, आपल्याच मनाप्रमाणे तिला रंगवायची हि जी भावना आहे तीच मला खूप आवडते. Graffiti मधला हा rebelism मला जास्ती भावतो. त्यामुळे Graffiti मध्ये कितीही Gaudy रंग असले तरी तिच्यातील या मुक्ताविष्कारामुळे ती आवडतेच. कदाचित काही मांडण्याचे स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे समाधान किंवा "Be A Rebel" अशी काहीशी भावना कुठेतरी आहे तिच्या मागे.

असो. भिंत वरून बरेच घसरलो - भरकटलो.

ज्या घरांमध्ये असे भिंतीवर रंगांचे, पेन्सिलीचे रेघोटे दिसतात ते घर मला लगेच आवडून जाते. अशा घरांमध्ये त्यातील बाळाची वाढ खुडणार नाही याची आपसूक खात्री मिळते.
आधी २ फुटांवर काढलेली वेगळीच चित्रलिपी-अक्षरलिपी मग जस जशी बाळाची उंची वाढत जाईल तसे ३-४ फुटांपर्यंत विकसित होत जाते. वळण नसलेल्या रेघोट्यांना मग हळूहळू आकार येत जातात. त्यांच्या अफाट कल्पनांना त्या भिंती कॅनवास देऊ लागतात. त्यांचं अवघं आकाश त्या भिंतींवर, चादरींवर सांडू लागतं.

खरतर व्यक्त होणं मूतणारया बाळाकडून शिकावं. त्यांचा भावनांना व्यक्त करायचा सर्वात सोप्पा मार्ग असतो - मिळेल त्या गोष्टीने भिंतीवर, चादरीवर रेघोट्या मारणे. अगदी सर्वात Raw मार्ग आणि सर्वात efficient. (नाहीतर इकडे इंटरनेट चालू होईपर्यंत अर्ध्या-अधिक कल्पना उडून जातात)

Yes, We are damn expressionist right from our birth ! पण मग आई रागावते "भिंतीवर नको लिहूस, राजा". मग तिचा तो राजा ताज्या वर्तमान पत्रावर लिहायला लागतो. त्यावर परत चिडचिड. मग तो जुन्या वह्या खराब करायला लागतो. पुन्हा चिडचिड. मग आता इथे नको लिहायला, तिथे नको चित्र काढायला असे करत करत काही लिहिण्यासाठी, रंगवण्यासाठी त्याला कोरीच पाने लागायला लागतात. नंतर नंतर तर अजूनच नाटकं सुरु होतात - branded वहीच, branded पेनच, branded रंगच, branded कॅनवासच ! असं करता करता "व्यक्त होणे" हा केवळ एक सोस राहतो त्यातला rawness, सृजन हे कधीच उडून गेलेले असते.

रंगवू द्यावं त्यांना -लिहू द्यावं त्यांना. भिंतीवर, चादरींवर, फळ्यांवर, ओसरीवर. त्यांचे कॅनवास, त्याचं आकाश असं हिसकावू नका.
मांडू द्या - सांडू द्या त्यांना! व्यक्त होऊ द्या त्यांना-मुक्त होण्यासाठी !

आदिमानवाने 'गुहेच्या भिंती खराब होतील', 'वनस्पतींचा रंग वाया जाईल' म्हणून आपल्या लहान मुलांना रागावले असते (त्यांना भिंती रंगवू नसत्या दिल्या ) तर "भीमबेटका" सारख्या ठिकाणच्या आदिमानवाच्या गुहांमध्ये काहीच लिहिलेलं, रंगवलेलं सापडलं नसतं आपल्याला.
कदाचित भविष्यात, ५००० हजार वर्षांनंतर, उत्खननात आपले शहर सापडेल. 244 फुटांवर माझ्या घराची भिंत सापडेल. आणि त्यावर माझ्या मुला-बाळाने काढलेले आकार-उकार सापडतील. त्यांच्या चित्रलीप्या सापडतील. त्यांच्या कल्पनेचे प्राणी पक्षी चितारलेले दिसतील त्यांना.
मग एखादा पुराणवस्तू संशोधक म्हणेल "त्याकाळी 'अशी' चित्रलिपी अस्तित्वात होती. आणि 'हे-हे' 'असे' प्राणी-पक्षी वावरत होते....इत्यादी इत्यादी "
आणि एखादा मानववंश संशोधक म्हणेल "त्याकाळाची लहान मुले खूप मुक्त वातावरणात वावरलेली दिसतात...इत्यादी इत्यादी "

Sunday, February 14, 2010

ग्रेस

Co-incidences मला नेहमीच जगवत आलेत
अगदी मी expect करत असणाऱ्या क्षुल्लक surprises पेक्षा आणि मला सुचणाऱ्या त्याहून क्षुल्लक surprises पेक्षा जास्ती surprises मला मिळालीत. चांगली आणि वाईटही. आणि या co-incidences मुळे मी नेहमीच surprised होतो. आता आजचंच बघा.

३-४ वेळा 'मितवा' वाचायला घेतलं. जास्ती कळायचंच नाही rather कळतच नाही. पण काहीतरी वेगळच वाचतोय आणि त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे इतकच कळत होतं. ("तांबे असे ते सोने होय ?" ) काहीकेल्या तो मागचा अर्थ कळतच नव्हता.
म्हणून मग google करू ठरवलं. टाईप केलं "marathi poet ...." सर्वात आधी नाव होतं "ग्रेस" चे. (कुसुमाग्रज , संदीप च्याही आधी to be precise).चांगलं वाटलं.जास्ती काही सापडलं नाही. पण "राजश्री मराठी" ने त्यांच्या वर केलेली एक documentary सापडली. "The Wonders of Poet Grace". तिच्या प्रस्तावनेत एक वाक्य असे होते.."मितवा चाळत असताना मी ग्रेसच्या एका इंग्रजी वाक्यापाशी शहारून थबकलो - 'i must see my cradle and grave both hanging ....'"
आणि अगदी याच वाक्यापाशी मी ते पुस्तक "काहीच कळत नाहीये" असं म्हणून बंद केले होते. ज्या वाक्यापाशी मी थांबलो होतो त्याच वाक्यापासून ती documentary सुरु होणे हा निव्वळ योगायोग ?

संदीप-सलीलच्या कविता ऐकून मुळूमुळू रडणाऱ्या लोकांपासून वेगळं दिसावं किंवा "मी ग्रेस वाचतो" म्हणजे काहीतरी great, intellectual वाटू - हा ग्रेस वाचण्यामागच्या कारणां पैकीचे केवळ ७ टक्के कारण असेल. पण आता खरं तर तसं दाखवण्याचा सोस नाहीये. जे भावतं(किंवा भावेल असं वाटतं ) ते वाचतो. ते famous नसेना, branded नसेना, critically acclaimed नसेना -तरी चालेल. आता 'माझी choice चांगली, quality वाली, standard (आणि जेणेकरून इतरांची वाईट ) ' असे दाखवायचा अट्टाहास पण नाहीये. मी एक "क्ष" लेखक वाचतोय. कारण मला "Mainstream Emotions" चा वीट आलाय. असो.....

यातली ग्रेसची काही वाक्ये (काही योगायोग (किंवा बादरायण संबंधहि :D))...
"......माझ्या कोणत्याही पुस्तकाची सुरुवात त्याच्या मुखपृष्ठापासून होत असते. त्याच्या चित्रापासून, पेपर बांधणी पासून, त्याची अक्षरापासून , त्याच्या मांडणी पासून कवितेच्या लयाचा परिसर आपोआप साकारत असतो....." ["आसक्त" च्या नाटकांचे असेच असते नाही का ('गार्बो', 'तू' आणि 'मात्ररात्र' -तिघांत )? आणि माझ्या पोस्ट्सचे पण (atleast try तरी) ?]
" There is no flag on the island..बेटाने आपल्या डोक्यावर पट्टी लावलेली नाही कि 'मी बेट आहे'....)"
मग काही संध्याकाळचे, craftsmanship, अंगसंगाचे चे काही विरूपण केले आहे त्यांनी त्यात ...
"i can become small for you but i cannot become simple for anyone..."
आणि त्यातून सापडलं ती जी.ए. बरोबर असणारी आंतरिक नाळ....आणि तेच अनाथपण ...
.................still i (/we) have not given up the mission of polishing the sky....

मग मितवा परत हातात घेतलं... यावेळी थोडे प्रकाशकण साथीला आहेत...बघू सापडताय का काही...
तरीही ग्रेस समजणे शक्यच नाही. पण ग्रेस चा उल्लेख या ना त्या कारणाने ब्लॉग मध्ये आला, त्यांचा स्पर्श झाला. (हेही नसे थोडके)

अगदीच टुकार आणि विनाकारण केलेल्या SMS ने सुरु झालेला आजचा दिवस - on-the-rocks होऊन, मग कंटाळवाणी वाट पाहून, दुपारी 'UP' सारखा नितांत सुंदर picture पाहून मग ग्रेसच्या "मितवा" पाशी अडखळला होता. मग ग्रेसला शोधत थोडं फिरलो. आणि आता शेवटी या "irresistible pastime" पाशी विसावला. What a Day !!

Sunday, February 7, 2010

Black *TONG*

मन्नू - ...........अजून १ कारण आहे माझ्याकडं ... माझे ओठ कधीच उलत नाहीत... हिवाळ्यात नाही - पावसाळ्यात नाही - उन्हाळ्यात तर नाहीच नाही.
i am "Kiss-Ready" all the year round .... हे कारण मान्य आहे का तुला ?
the only n the safest thing we can do together....
नीरु - Shut up !!! कधी कधी Bad Breath सहन करावा लागतो मला. अ बिग नो !
मन्नू - ठीके. मिंट खात जाईल मी भरपूर मग ... दिवसभर ..
नीरु - नको... नको मिंट खाल्ल्याने "Impotency" येते म्हणे .... नो ..
मन्नू - मग मी भरपूर "कांदा" खात जाईल..त्याने power वाढती म्हणे ... आता ?
नीरु - म्हणजे परत तो कांद्याचा घाण वास.... "नो" च ..
मन्नू - परत मिंट मग.... मिंट - कांदा - मिंट - कांदा - मिंट .... all the year round...जितके उरले आहेत तितके ....
नीरु - अर्रे आलास परत तिकडेच...... ठरलं होतं ना आज याबद्दल काहीच बोलायचं नाही ...
मन्नू - ...................म्हणजे लोकं अगदी ओठ काळे-कुट्ट होईपर्यंत सिगारेट पितात, दातांच्या .........
नीरु -.......नको ना ते .. चालू ठेव ना हेच ...please मन्नू ......
मन्नू - ....................दातांच्या अगदी फळ्या होईपर्यंत गुटखा, मावा खातात आणि अगदी लिवर बाहेर येईपर्यंत दारू पिऊन ओकतात ...
नीरु - "Yes" ..."हो" आहे माझ्याकडून ...पटलं मला ओठांच कारण...चल बदल विषय...
मन्नू - .....................आणि मी.. रक्त द्यायला जावं आणि .....
नीरु - मन्नू, अशा लहान-सहान दिवसांच्या Anniversaries तरी कितीशा उरल्यात ? निदान आज तरी नको रडूस...
मन्नू - ......................आणि तरी ते भरपूर जगतात....आणि त्यांच्या बायकांना असं ओठांच्या रंगासाठी convince पण नाही करत..........
नीरु - .... तुझ्याशी लग्न करायचं धाडस नाही होतंय माझं अजून...
मन्नू - जर हे लग्नानंतर समजलं असतं तर ?
नीरु - नको रे असे प्रश्न विचारूस. मी खोट्या उत्तरांनी कसंबसं स्वतः च समाधान केलंय.. ..
नको ना परत... केवळ तुझ्यासाठी कशीबशी उभी राहिलीये ....
ऐक न.. मी असेल तुझ्याच जवळ.....अशीच, नेहमी....
पण हा हट्ट नको ना. आज नको......... कधीच नको...
-------------
आजकाल हे असं chunks मध्ये सुचतं. काही प्रसंग, भावना, पात्रं सुचतात नुसते. Complete स्टोरी काही हातात लागत नाही.
पण हे असे Chunks or Components पण भरपूर useful असतात. कुठेही वापरता येतात.
आता ते "मिंट-कांदा-मिंट ..." पर्यंत चा प्रसंग "मात्ररात्र" मध्ये वापरता येईल.
पूर्ण प्रसंग एखाद्या एड्स वरच्या Short-Film साठी पण .....
Reusable Components !
ते काहीतरी Comedy / Black Comedy काहीतरी असतं ....त्यासारखं हे झालाय "Black Se..." (sorry) "Black *TONG*"
आणि 'रेनकोट' चालूये background ला म्हणून मन्नू-नीरु ...... ३ रा post 'रेनकोट' चा उल्लेख असणारा...

Tuesday, February 2, 2010

Shaadi.com

आणि मग असं ठरलं की अत्तराचं प्रदर्शन भरवायचं...
कितेक प्रकारची अत्तरं. कुठून कुठून आली होती अत्तरं. गावाकडची, लहान शहरातून आलेली, काही देशी- काही विदेशी तर काही विदेशी नावाची देशी अत्तरं आणि देशी नावाची विदेशी सुद्धा !
आणि त्यांच्या बाटल्या तर ? एकेक अत्तराची बाटली म्हणजे वेगळीच कलाकृती. बहुतेक बिलोरी काचेच्या- काही गडद निळ्या तर अग्गदी लाल काही. काही पिवळ्या-भगव्याही. काही transparent तर काही आतला काहीच थांगपत्ता न लागू देणाऱ्या. अगदी चमकदार रंगात काही तर काही रंगहीन असूनही चमकणाऱ्या. नव्या देवदास मधल्या पारोच्या घराच्या खिडक्या वितळवून या काचेच्या बाटल्या बनवल्यात जणू.
आणि आकार तर काय विचारता ? काही अगदी बाकदार तोंडाच्या, तर काही आरामशीर स्थिरावलेल्या धष्टपुष्ट. काही अदाकारी ने झुकलेल्या तर काही ताठ, माजात मान सरळ ठेऊन उभ्या. काहींना आकर्षक पैलू पाडलेले तर काही अगदी एखाद्या शिल्पा प्रमाणे कोरीव. काही उंच, सुंदर - काही ठेंगण्या, हसऱ्या.
त्यात पण काही मातीच्या वाटाव्या इतक्या सुबक, तर काही चांदीच्या वर्खाने मढलेल्या. काहींच्या "फुस्स-फुस्स " करणाऱ्या नळी जवळ हिरे-मोती जडवलेले. काही काही गावठी flavours पण होते तर काही काही अगदी branded , घरंदाज अत्तरं पण होती.
सगळ्या बाटल्या वेगळ्या एकमेकांपासून. एकाच प्रकारची दुसरी बाटली, दुसरे अत्तर सापडणार म्हणे तुम्हाला.
किंमती पण अगदी रास्त. साधी स्वस्त अत्तरं पण होती आणि अगदी उंची, किमती अत्तरं पण होती. सगळ्या किंमतीतली अत्तरं होती अगदी सगळ्यांना परवडतील अशी. काहीकाही तर अत्तराच्या वापरलेल्या बाटल्या पण होत्या.

कोणी हि तर कोणी ती बाटली घेतली. आपल्या आवडीनुसार, ऐपतीनुसार, गरजेनुसार लोकं बाटल्या सॉरी अत्तरं खरेदी करत होते. खूप मागणी वाढली होती आणि खपही कित्येक पटीने वाढला होता.

दिवस संपताना ८ वर्षाचा जहांगीर म्हणतो कसा "बाबा, सगळ्यांनी बाटली बघूनच अत्तरं खरेदी केली. लोकं बाटल्या घ्यायला आले होते का अत्तरं ? एकानेही झाकण उघडून आत काय आहे , कसं आहे ते बघितलं नाही."