Pages

Monday, February 22, 2010

Bookmark !

(फोन वाजतोय...)
विंदा : ....'दा' ...
वृंदा : ...'दा' ?? हलो . विंदा तू ? flight मिस झाली ? शिकागोला पोचलास लगेच ? कुठे आहेस तू ?
विंदा : शांत हो 'दा' ...transit मध्ये आहे...Dubai Airport वर कुठेतरी... एक काम कर माझं..
वृंदा : काय झालं ? काही राहिलं का ? Invitation letter ? "Forex" ??? कितीरे वेन्धळा आहेस तू. विसरलास का काही इकडेच ..
विंदा : २ min. गप्प बसशील 'दा' ? ... बेडरूममध्ये जा आपल्या. विसरलोय मी एक गोष्ट....
वृंदा : तू ना ...
विंदा : गप्प...एकदम गप्प ! बेड जवळ जा..माझ्या उशाशी ते पुस्तक असेल "आदिमाया"....
वृंदा : हं ...
विंदा : काल रात्री तुला वाचून दाखवत होतो. हा तेच पुस्तक .. झोपून गेलीस मांडीवरच ऐकता ऐकता ... तुझ्या केसाची hairpin आहे bookmark त्या पानावर....
वृंदा : हो आहे. पान ९३.
विंदा : अं अं ...हळूच.... जपून... तुझ्या पापणीचा केस पण आहे त्या पानावर... कालच तुला वाचून दाखवणार होतो हि कविता....
(दोघेहि एकदम) "घराकडच्या आठवणी..."
विंदा :
"घराकडच्या आठवणी : दारावरच्या कडीच्या, घातल्या घातल्याच्या ,
न्हाणीतल्या साबणाच्या सवयीच्या वासाच्या. चौघांच्या श्वासांच्या.
चड्डीच्या नाडीचे टोक आत गेल्याच्या.गालफुगव्या आवळ्याच्या ,...."
वृंदा :
"..... खिडकीवरील कावळ्याच्या,थर्मामीटर फुटल्याच्या, एकदाची गाठ सुटल्याच्या.
भांडल्याच्या, शेजारणीच्या उखळामध्ये रेशनची करड कांडल्याच्या.
बटणे हरवल्याच्या ; हरवल्यावर सापडल्याच्या ; सापडून पुन्हा हरवल्याच्या."

(वृंदा बेडवर बसत ...त्याच्या पांघरुनाला जवळ घेऊन .. )
...दा :
"....बीटाच्या, थीटाच्या, केरसुणी बांधल्याच्या. फुटकी कांच सांधल्याच्या.
आमसुलाच्या साराच्या, लोणच्याच्या खाराच्या. गौरीच्या, गणपतीच्या.
आरशावर पडलेल्या तेलाच्या डागाच्या; रुसलेल्या रागाच्या."
...दा :
"....'आम्ही-म्हणजे-अडचणी'च्या ; 'सगळी सोंगे' वगैरेच्या; 'पावडर-दिसते-आहे-का' च्या.
बाटलीमध्ये अडकलेले सबंध बुच काढल्याच्या. हातावर वाढल्याच्या.
आशेच्या, निराशेच्या. रद्दीमध्ये फसल्याच्या. संडास बंद असल्याच्या.
चेंडू हरवून झाल्याच्या. खिडकीशी काढलेल्या कानातल्या मळाच्या.
संथ खोल पाण्यामध्ये नियतीच्या गळाच्या. एकटीच्या बळाच्या .........."

...दा : खूप जास्ती आठवण येणारे तुझी.....
...दा : तुझा आवाज ऐकायचा होता कधीपासून ...
...दा : ..खूप काही तिकडेच विसरून चाललोय मी .....

3 comments:

sagar said...

परत माझीच कॉमेंट..
विंदा करंदीकरांची कविता आणि काल "घरपोच कविता " ऐकताना सुचलं हे.
१९६७ ची आहे हि कविता. त्यामुळे सगळ्याच आठवणी जरा जुन्याच, त्या काळातल्या. त्यांना जरा नवीन टच देणार होतो.
पण जमलं नसतं मला. म्हणून black-n-white च ठेवलं त्यांना.
आणि हो. शिकागोलाच लिहिलीये त्यांनी हि कविता. असाच प्रसंग असेल का ?

इनिगोय said...

kiti sundar lihitos tu. tuzi angulimal chi post pan agadi angawar ali.
keep up writing.. :-)

sagar said...

Thanks Yogini-Tai.. :)