Pages

Quickie

लोणचं मुरावं लागतं. बराच काळ ते खारात, तेलात ठेवावं लागतं. बरणीत ठेऊन Patiently वाट पहावी लागते. असं लोणचं घातलं आणि लगेच ते मस्त आंबट-गोड-तिखट झालाय, मस्त पाणी सुटतंय तोंडाला असं होत नाही. थोडा काळ मुरु दिलं  कि मगच ते चांगलं लागतं. 
Blogs चं पण असंच. पहिलाच post वाचला आणि लगेच आवडला असं होत नाही बहुदा. निवांत बसून एकेक post वाचत गेलं कि समजतं blog कसा आहे ते. मग बरेच निरर्थक posts पण  असतात - निर्मितीच्या impulse मध्ये चांगले वाटलेले किंवा काही अगदीच सुमार - लिहायचं म्हणून लिहिलेले. पण मग या बऱ्याच posts मध्ये काही अगदीच चांगले असतात पण मग ते बाकीच्यांच्या मध्ये लपून जातात. सगळेच लोकं काही निवांत blog मध्ये मुरेपर्यंत वाचत बसत नाही. mouse click मनापेक्षा जास्ती चंचल असतो. म्हणून अश्या लोकांसाठी हे page.
माझ्या ब्लोगचा एकूणच अवतार पाहता लोकं जास्ती वेळ टिकत नाहीत असं Google Analytics चं म्हणणं होतं ! 
ReadyMade लोणची मिळतात ती already मुरवलेली असतात. तसाच काहीसं हे.    
Nervous Nineties (९९ पोस्ट्स till date to be precise) मध्ये आहे सो पाचेक चांगल्या पोस्ट्स निघाल्या (बळंबळंच)       
 मला आणि माझ्या काही ठराविक मित्रांना आवडलेल्या पोस्ट्सची हि Quick Link ('Quickie' सारख्या शब्दांबरोबर माझा जरा जास्तीच सख्य आहे :) ) 

0.  माझा प्रचंड आवडता पोस्ट - समेवर... 
1. पहिली कविता 'आई' वरच लिहायला हवी का ? 'बाई' वर लिहिली तर ?  For Those Beautiful Moments of Guilt !
2. "आदिमाया fanclub" - विंदा great आहेत Bookmark !
3. जास्ती मेहनत नाही घेतलेली. सुचलं तसा लिहित गेलेलो - Shaadi.Com 
4. खूप दिवस मनात होता हा पोस्ट. खूप प्रसंग आठवलेले -  अंतर 
5. काहींना संदीप वर केलेला वाटतो हा. पण मला माझ्यावरच - Celebrity !
6. नेहमीचं feeling - ATM  
7. हा पण कसा सुचला कोण जाणे - Highway आणि  पायवाट  
8. संगीत भिनावं  रक्तात असं - Pour some Music !
9. Into The Wild ने झपाटलेलो तेव्हापासून - HAPPY FRIENDSHIP DAY, ALEX !
10. Mainstream पाऊस - Wanted Alive
11. काई पणे हा पोस्ट  गजरा -   Have u bought Gajra Lately ?
काही माणसांच पण असंच असतं नाही का ? जितका जास्ती वेळ आपण त्यांच्या बरोबर घालवतो तितके जास्ती ते मुरतात, चांगले वाटायला लागतात. First Impression मध्ये आवडून जाणारयातला मी नाही त्यामुळे हे "मुरण्याचे" logic जास्ती  पटते  मला. असो.